Birsamunda histroy

Birsamunda histroy

Birsa Munda – बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते.
आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.
Birsa Munda

आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा – Birsa Munda History In Marathi

बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.

Comments

Popular posts from this blog

Birsamunda story (बिरसा मुंडा)

Birasa Munda Jankari